जनआशिर्वाद यात्रा ठरणार प्रेरणादायी
रत्नागिरी:- कोकणचे नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायणराव राणे यांच्या दौऱ्यामुळे रत्नागिरीत भाजपमय वातावरण झाले आहे. भाजपचे झेंडे सर्वत्र झळकले असून नारायणराव राणे यांच्या स्वागतासाठी असंख्य पोस्टर्स नाक्यानाक्यावर लावण्यात आली आहेत. शिवाय केंद्रीय मंत्री राणे यांच्यासमवेत भाजपचे राज्याचे बडे नेते, कोकणातील सर्व आमदार दौऱ्यात सहभागी होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा, भाजप पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार जनआशिर्वाद यात्रा काढण्यात येत असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्यापासून दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात जनआशिर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे.
माजी मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि दीर्घ काळ आमदार राहिलेल्या राणे यांना प्रथमच केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याने जनतेचे आशिर्वाद घेण्यासाठी श्री. राणे उद्यापासून रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. आज खेडमधून त्यांचा दौरा सुरू झाला. खेड, चिपळूण, आरवली, संगमेश्वर, निवळी व तिथून रत्नागिरीत जन आशिर्वाद यात्रा दाखल होणार आहे. याकरिता जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.
दक्षिण जिल्हा दौरा दिनांक २४ रोजी स. ११.४५ वाजता सुरू होणार आहे. त्या वेळी आरवली (संगमेश्वर) येथे राणे यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. दु.१२.१० वाजता ते गोळवली प. पु. गोळवलकर गुरुजी प्रकल्पाला भेट, कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण, दु.१.२० वाजचा संगमेश्वर एस.टी.स्टॅण्ड येथे सत्कार, दु. २.०० वाजता वांद्री येथे आगमन व सत्कार. दु. २.३० वा निवळी येथे स्वागत, दु.३.०० वाजता रत्नागिरी शहरात मारुती मंदिर सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण, दु. ३.१० ते सायं. ४.१० वाजताचा वेळ राखीव.
सायं.४.१० वाजता कै. शामराव पेजे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण, सायं. ४.२५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण, सायं.४.४५ वाजता गोळप येथे आंबा प्रक्रिया उद्योजक विजय देसाई यांच्या आंबा कॅनिंग फॅक्टरीला भेट आणि आंबा- काजू बागायतदारांची बैठक, सायं.६.०० वाजता द. रत्नागिरी जिल्हा भा.ज.पा कार्यालयात नारायणराव राणे यांचा जंगी सत्कार, सायं.६.५५ वाजता मराठा भवन येथे सत्कार, अन्य शिष्टमंडळाच्या भेटीगाठी. रात्रौ.८.१५ वाजता माजी आमदार शिवाजीराव गोताड यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट व रात्रौ. ८.४० वाजता भाजपचे तालुकाध्यक्ष, नगरसेवक मुन्ना चवंडे यांच्या निवासस्थानी भेट.
दिनांक २५ ऑगस्ट– स. ९.०० वाजता जैन मंदिराला भेट, ९.१० वाजता लोकमान्य टिळक जन्मस्थान, ९.२५ मिनीटांनी पतितपावन मंदिर आणि वीर सावरकर स्मारक, संग्रहालयाला भेट, स. १०.१५ वा. पत्रकार परिषद. स. ११.०० वा. कुवारबाव येथे पंतप्रधान आवास योजना स्थळाला भेट, ११.३० वा. हातखंबा नागपूर पेठ येथे सत्कार, स. ११.५० वाजता पाली येथे सत्कार, दु.१२.३० वाजता लांजा येथे सत्कार, दु.१.१५ वा. ते दु.२.०० राखीव वेळ, ,दु. २.१० वाजता कुवे गणपती मंदिर येथे दर्शन आणि नंतर दु. २.३५ वाजता ओणी येथे सत्कार, दु.३.१५ वा. राजापूर येथे सत्कार आणि ते पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे रवाना.
श्री. राणे यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी भाजप द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत.