कृषी उत्पादनांची माहिती मिळणार आता एका क्लिकवर

रत्नागिरी:- कृषी उत्पादनांची माहिती आता केवळ एका क्लिकद्वारे शेतकर्‍यांना मिळणार आहे. यासाठी शेतकर्‍यांनी स्मार्ट फोनवर उत्पादनाचा क्यूआरकोड स्कॅन करावा लागणार आहे. त्यानंतर त्या उत्पादनाची सर्व शिवार माहिती, पॅकिंग, उत्पादनासाठी कराव्या लागणार्‍या चाचण्यांसहित इत्यंभूत माहिती समजणार आहे.

कृषीविषयक कुठलीही माहिती हवी असेल, तर क्यूआर कोड स्कॅन करा आणि एका क्लिकवर माहिती मिळवा, अशी सुविधा आता एका अ‍ॅपद्वारे उपलब्ध झाली आहे. या अ‍ॅपवर  कृषीविद्या, उद्यानविद्या, पशुविज्ञान, गृहविज्ञान, माती परीक्षण, कृषीविस्तार, पीकसंरक्षण अशा कृषीविषयक विविध विषयांची माहिती संकलित करण्यात आली आहे. ही माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून मोबाईलद्वारे थेट उपलब्ध होणार आहे.  शेतकर्‍यांना जेव्हा शेतीमध्ये कृषीविषयक माहितीची गरज असते तेव्हा त्यांच्याकडे बर्‍याच वेळा माहितीपत्रक उपलब्ध नसते. परंतु मोबाईल असल्याने ज्या विषयाची त्याला माहिती हवी असते तेव्हा स्कॅनरद्वारे त्याचा कोड स्कॅन करून ती उपलब्ध होऊ शकते.