कुवे येथे ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

लांजा:-  शुक्रवारी सकाळी कुवे येथे दुचाकी (क्रमांक MH 08AM 2676 ) वरील चालक हा कुवे ते लांजा असा येत असताना त्याच्या पाठीमागून येणारा अज्ञात आयशर सारख्या वाहनाचे चालकांने ठोकर दिल्याने शिवाजी रामा बेहरे (वय 55 राहणार, आरगाव पूनने) हे दूचाकी स्वार हा जागीच मयत झाले.

यावेळी आयशर चालक जागेवरून फरार झाला.लांजा पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी नाकाबंदी केली. नमूद आयशर ट्रक चां पोलीस पथकाने शोध घेतला सदर आयशर कंटेनर (MH 04 KF 7116) हा लांजा येथील धाब्यावर थांबला होता .यावेळी पोलीस हवालदार सचिन भुजबळराव, रहीम मुजावर , पोलीस उमाजी बजागे, महिला पोलिस नंदा मोहिते यांना दिसून आला.यावेळी ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आलेले आहे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.