रत्नागिरी:- कुवारबाव येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मनोहर कृष्णा वारिशे (वय ५५, रा. कुवारबाव-रत्नागिरी मुळ ः रा. कुवे, ता. लांजा) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २७) सकाळी दहाच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनोहर वारिशे हे मानसिक रुग्ण होते. १८ जुलैला ते घरातून निघून गेले होते. नातेवाईकांकडून त्यांचा शोध घेण्यात आला होता. मात्र ते सापडले नाही रविवारी सकाळी ते बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या कुवारबाव येथील घरा शेजारी सापडले. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकित नोंद करण्यात आली आहे.









