रत्नागिरी:- शहरानजिक कुवारबाव येथे आज सकाळी पती-पत्नीचे मृतदेह घरात लटकलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कुवारबाव येथील बंद घरात हे मृतदेह आढळले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित राजेन्द्र चव्हाण (वय29)आणि पूजा रोहित चव्हाण (वय28) अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांचे मृतदेह ते वास्तव्य करीत असलेल्या अनुराधा अपार्टमेंट, ओम विहार, पडवेवाडी येथे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.या दोघांच्या मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित करण्यात येत आहेत. या दोघांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचा तपास पोलीस यंत्रणा करत असून दोघांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.