रत्नागिरी:- खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या वृद्धाला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. मात्र प्रवासात तब्बेत खालवल्याने पुन्हा उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना तपासून मृत घोषित केले. महादेव विश्वनाथ कोरे (वय ६२, रा. अब्रज अपार्टमेंट स्टेट बॅंक कॉलनी, रत्नागिरी, सध्या- रविंद्र नगर, कुवारबाव, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २९) दुपारी साडेतीनच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महादेव कोरे यांची तब्बेत बिघडल्यामुळे शनिवारी (ता. २७) खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात येत होते. प्रवासात त्यांची तब्बेत आणखीनच चिंताजनक झाल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.