कुवारबाव येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- शहराजवळील कुवारबाव पाटबंधारे कॉलनी येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. संतोष महादेव बनसोडे (४०, मुळ ः कर्नाटक सध्या रा.पाटबंधारे कॉलनी कुवारबाव, रत्नागिरी)मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २०) सकाळी सव्वा आठच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी ते रुमच्या बाहेर पायरीवर बेशूध्द अवस्थेत दिसून आले. म्हणून तेथील नागरिकांनी त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी संतोषला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.