रत्नागिरी:- कुवारबाव ग्रामपंचायतीने पाणीपट्टी कर वाढीचा घेतलेला निर्णय हा गाव विकास आघाडी आणि सरपंचांचे पाप आहे. त्यांनी ते दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न करू नये. आम्हाला जनतेने नाकारले आहे. मात्र ज्यांना स्विकाले त्यांनी गावच्या माथी कर वाढ लादली. ज्यांनी करवाढ केली त्यांनी उपोषण करण्यापेक्षा बल्ब खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे काय ते सांगावे. त्यांच्या विरोधात आमची अपात्रतेची प्रक्रिया सुरू आहे, अशा शब्दात शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटे काढत कर वाढीच्या वादामध्ये उडी मारली.
येथील पालिकेत पत्रकारांशी झालेल्या अनौपचारीक चर्चेवेळी ते बोलत होते. गेली काही दिवस कुवारबाव
ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधाऱ्यांनी केलेल्या पाणीपट्टी कर वाढीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गाव विकास पॅनेलमध्ये असलेले उपसंरपंच बबलू कोतवडेकर यांनी यापूर्वीच सत्ताधाऱ्यांनी पाणपट्टी कर वाढीचे खापर आमच्यावर फोडुन नये, हा सर्वांनुमते घेतलेला निर्णय आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यावर सत्ताधाऱ्यांनी आपली बाजू मांडताना शिवसेनेने बहुमताने पाणीपट्टी कर वाढ मंजूर केल्याचा आरोप सरपंचांनी केला होता.
या वादामध्ये शिवसेने उडी मारली आहे. सेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी म्हणाले, कुवारबाव ग्रामपंचायीचा पाणीपट्टी कर वाढीचा निर्णय हे सत्ताधाऱ्यांचे पाप आहे. सरपंच म्हणून त्यांच्यापुढे हा विषय आला होता. त्यांनी काय केले. या विषयाची इतिवृत्तामध्ये नोंद झाली असली तरी त्यावर स्वाक्षरी येत नाही. त्या कशा आल्या. जे उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी २५ रुपयाचे बल्ब १०० रुपयाला खरेदी करून भ्रष्टाचार केला. त्याच्या विरोधात आम्ही अपात्रतेची प्रक्रिया सुरू केली आहे. गावकऱ्यांनी चुकीच्या लोकांना निवडुन दिल्याचे आता सिद्ध होत आहे. सेनेकडे अनेक वर्षे सत्ता होती मात्र
ग्रामस्थांच्या माथी कोणती कर वाढ लाधली नाही. पायाभूत सुविधा देणे हे ग्रामपंचायतीचे काम आहे. जे सत्तेवर आहेत, त्यांनीच कुवारबावच्या ग्रामस्थावर वाढीव कर लाधला आहे. जे नलावडे उपोषणाला बसणार आहेत, ते इथे कमी आणि परदेशात जास्त असतात. त्यांनी गावचे प्रश्न आम्हाला शिकवू नये, असा टोलाही लगावला.