किरीट सोमय्यांविरोधात रत्नागिरीत शिवसैनिकांचे आंदोलन

रत्नागिरी:- भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या वादग्रस्त व्हिडीओ क्लीप वरुन राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना रत्नागिरी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी सोमय्या यांचा निषेध करीत चप्पल मारो आंदोलन केले.

शहरातील आठवडा बाजार येथील शिवसेना कार्यालयाबाहेर हे आंदोलन दुपारी करण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, उपतालुकाप्रमुख संजय साळवी, प्रमोद शेरे, युवा तालुकाधिकारी प्रसाद सावंत, महिला पदाधिकारी मनिषा बामणे, संध्या कोसुंबकर, महिला तालुका संघटक साक्षी रावणंग, माजी जि.प. अध्यक्ष जयसिंग घोसाळे, शेखर घोसाळे, माजी जि.प. सदस्य महेंद्र झापडेकर, साजिद पावसकर यांच्यासह शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी किरीट सोमय्या यांचा निषेध करण्यात आला. भाजपाने पक्षातून किरीट सोमय्या यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी महिला पदाधिकार्‍यांनी केली. यावेळी किरीट सोमय्या यांच्या बॅनरला महिला पदाधिकार्‍यांनी छप्पल मारो आंदोलन केले व बॅनर पेटवून निषेध केला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.