किरीट सोमय्यांना अटक करा; शिवसेनेचे रत्नागिरीत आंदोलन 

रत्नागिरी:-  ‘घोटाळेबाज किरीट सोमय्यांना अटक करा’,’गली गली मे शोर है किरीट सोमय्या चोर है!’ अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांना भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या अटकेची मागणी करत ‘आयएनएस विक्रांत ‘वाचविण्यासाठी गोळा केलेले पैसे स्वत: साठी वापरणाऱ्या किरीट सोमय्या यांचा शिवसैनिकांनी निषेध केला. खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन केले.

 यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी मनोगत व्यक्त करताना किरीट सोमय्यावर हल्ला चढविला. सन २०१३ मध्ये आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी  मोहीम सुरू केली. सरकारांने असमर्थता दर्शवल्यानं किरीट सोमय्या पुढे आले होते. त्यांनी  प्रचंड निधी गोळा केला. त्यासाठी रेल्वे स्थानकांवर विमानतळावर डबे घेऊन उभा राहिले. ‘आयएनएस विक्रांत’ हा देशाच्या दृष्टीनं अभिमानाचा विषय असल्यानं लोकांनी सढळ हस्ते दान केलं. नेव्हीनगरमध्ये राहणार्‍या नौदलाच्या अनेक अधिकार्‍यांनी प्रत्येकी ५ ते १० हजार रुपये दिले. या रकमेचं किरीट सोमय्या यांनी काय केलं? ते देशाला समजायला हवं, ही रक्कम ते भंगारात जाऊ पाहणार्‍या विक्रांत युद्धनौकेचे स्मारक बनविण्याकरिता राजभवन येथे जमा करणार होते, मात्र सोमय्याने गोळा केलेली रक्कम राजभवनाला मिळाली नसल्याचं आरटीआयमधून समोर आलं आहे. लोकांच्या देशप्रेमाशी खेळून किरीट सोमय्याने गद्दारी केलं आहे असा आरोप विलास चाळके यांनी केला.

किरीट सोमय्या यांच्या  विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. किरीट सोमय्याने आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या निधीचं काय झालं? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण तो देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. लोकांनी मोठ्या विश्वासानं विक्रांत वाचवण्यासाठी देणगी दिली. राजभवनानं आपल्याला किरीट सोमय्याकडून कोणताच निधी किंवा चेक मिळाला नसल्याचं माहिती अधिकाराखाली मागविलेल्या उत्तरावर स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे. किरीट सोमय्याने गोळा केलेला पैसा राजभवनात जमा झाला नाही, मग तो कोणाच्या खिशात गेला? हा पैसा कोणी खाल्ला ? ह्याची उत्तरे राज्यातील जनतेला मिळायलाच हवीत. या घोटाळ्यात किरीट सोमय्यांने अंदाजे १०० कोटींचा घोटाळा करून हे पैसे त्यांच्या बांधकाम व्यवसायाकरिता तसेच निवडणूक खर्चाकरिता वापरल्याचा अंदाज व्यक्त  केला जात आहे. अशा देशद्रोही कृतीमुळे किरीट सोमैय्या यांना राज्यात काय देशातही राहण्याचा अधिकार नाही. राज्य सरकारने किरीट सोमय्यांवर तात्काU गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अशी मागणी श्री.चाळके यांनी केली.

यावेUी आंदोलनात उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, माजी जि.प. अध्यक्ष जयसिंग घोसUे, विभाग प्रमुख विजय खेडेकर, माजी सभापती सौ. संजना माने, सौ.शिल्पा सुर्वे, माजी पं.स. सदस्य साक्षी रावणंग, सौ.दया चंवडे, मनोज साUवी  यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्ये  सहभागी झाले होते.