किरण देसाई ९ लाखांच्या बनावट नोटा घेऊन रत्नागिरीत येणार होता; पोलिसांच्या कारवाईने मोठा डाव फसला

रत्नागिरी:- बनावट नोटा खरेदी प्रकरणात सापडलेला रत्नागिरीतील मास्टरमाईंड किरण देसाई आणि गिरीश पुजारी हे नऊ लाखांच्या बनावट नोटा घेऊन रत्नागिरीत येणार होते. चार लाखांना हा सौदा ठरला होता. रत्नागिरी बाजारपेठेत या बनावट नोटा चलनात येण्यापूर्वीच पोलिसांनी या टोळीला बेड्या ठोकल्या आणि मोठा धोका टळला. 

बनावट नोटांचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीच्या ३ जून २०२१ रोजी दांडेली पोलिसांकडून मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. त्याच्यांकडून सुमारे ७२ लाख किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. यावेळी पोलिसांकडून ६ जणांना अटक करण्यात आली होती.यामध्ये रत्नागिरीतील किरण मधुकर देसाई (४०,मजगांव रोड) व गिरीष पुजारी (४२,जाकादेवी) यांना बनावट नोटांसह ताब्यात घेण्यात आले होते.

९ लाख रूपयांच्या बनावट नोटा किरण देसाई व गिरीष पुजारी हे रत्नागिरीत आणणार होते.यासाठी किरण व गिरीष यांनी दांडेली येथे राहणारा शिवाजी कांबळे याला ४ लाख रूपये देऊन ९ लाख रूपयांच्या बनावट नोटांचा व्यवहार केला.हा व्यवहार सुरू असतानाच दांडेली पोलिसांनी छापा मारून कारवाई केली होती.पोलिसांनी घटनास्थळी सर्च आॅपरेशन केले असता त्यांना एकू ण ७२ लाख रुपयांच्या बनावट नोटा शिवाजी कांबळेच्या घरी आढळून आल्या.किरण व गिरीष आपल्या ओळखीच्या माणासाच्या माध्यमातून कर्नाटक येथे गेले होते.किरण व गिरीष हे दोघेही रत्नागिरी येथील रहिवासी आहेत. त्यांच्या या बनावट रॅकटेच्या प्लनमध्ये अजून कितीजण सहभागी आहेत का याबाबत कर्नाटक पोलिसांकडून शोध चालू आहे.