कासवांच्या नोंदीसाठी ‘एम टर्टल’ ॲप

रत्नागिरी:- जिल्ह्यातील दापोली, राजापूर, रत्नागिरी, गुहागर हे चार तालुके कासव संवर्धन करणारे तालुके म्हणून नावारुपाला येत आहेत. कासवांच्या घरट्यांची आणि पिल्लांच्या नोंदी करण्यासाठी ‘एम टर्टल’ ॲप तयार करण्यात आले आहे. अशा प्रकारचे भारतातील पहिले ॲप असून या अँपमुळे कासवांच्या घरट्यांची आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांच्या संख्येची नोंद होण्यामध्ये सूसुत्रता येणार असून जगातून कोठूनहि माहिती मिळणार आहे.

महाराष्ट्रातील किनार्‍यावर सागरी कासव संरक्षण मोहिम सन २००३ पासून सुरु आहे. यासाठी वनविभागाने कासव मित्रांची नेमणूक केली आहे. भारतीय सागर किनार्यांवर ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉक बिल, लॉगर हेड या चार जातींची समुद्री कासवे आढळून येतात. यापैकी कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे प्रजननासाठी येतात. सरासरी २ फुट लांबीच्या या कासवांचे वजन ४० ते ४५ किलोपर्यंत असते. कासवांच्या माद्या केवळ विणीच्या हंगामातच अंडी घालण्यासाठी येतात. मानवी हस्तक्षेपामुळे कासवांचे बरेच अधिवास कायमस्वरुपी नष्ट झाले आहेत. यासाठी वनविभागकासवमित्र व वन खात्याच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी गस्त घालून कासवाने घातलेली अंडी संरक्षित करण्याचे काम कासवमित्रांनी सुरु केले आहे. अंडी समुद्रकिनारी नेटने बांधलेल्या जाळीमध्ये खड्डे काढून संरक्षित करण्यात येतात. केंद्र उभी करताना घरट्यांना येणार्या सर्व धोक्यांचा अभ्यास करन केंद्र उभी केली जातात. त्यामुळे वन्य प्रण्यांपासून या अंड्यांचे संरक्षण होते.वनविभाग, मँग्रे फाऊंडेशन, मँग्रे सेलसाठी सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूणने हे अँप तयार केले असल्याची माहिती संस्थेचे भाऊ काटदरे यांनी दिली. या अँपपसंदर्भात संस्थेमार्फत कासवमित्रांना कार्यशाळा घेऊन प्रिशक्षण देण्यात आले आहे.या कासवमित्रांमार्फत रोज सकाळी किनाऱ्यांवर पाहणी करून कासवांनी अंडी घातली असली तर ती खड्डे काढून पुरली जातात. पुर्वी अंडी, घरट्यांची माहिती कागदावर भरली जात असे यामध्ये खूप वेळ जात असे. परंतु या ॲपपमुळे हे काम सोपे होणार आहे. या अँपपमध्ये अंडी, घरटी संख्या, पिल्लांची संख्या नोंदविण्यात येणार आहे. तर अक्षांश, रेखांश घेतले जातात. तारीख, वेळ घेतली जाते. त्यामुळे जगात कोठूनहि ही संख्या समजू शकणार आहे. या ॲपपमध्ये ऑनलाईन, ऑफलाईनहि काम करता येणार आहे.  महाराष्ट्रात ५५ किनाऱ्यांवर कासव संवर्धन केले जाते. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात आंजर्ले, केळशी, कर्धे, मुरुड, दाभोळ, लाडघर, वेळास, गुहागर, तवसाळ, गावखडी, माडबन, वाडावेत्ये या १३ ठिकाणी कासव संवर्धन केले जाते.