रत्नागिरी:- रत्नागिरी शहरापासून पासून जवळच असलेल्या काळबादेवी समुद्र किनारी जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवाला येथील ग्रामस्थांनी जीवदान दिले. जाळ्यातून सोडवणूक करत कासवाला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले.
काळबादेवी येथील फडजीवाडी नंबर 1 येथील समुद्र किनारी जाळ्यात कासव अडकल्याचे ग्रामस्थांच्या निदेर्शनाला आले. जाळ्यात अडकलेल्या कासवाला तेथील श्री विशाल (पिंट्या) भोळे, श्री.निनाद (पपन) मयेकर, विक्रांत मयेकर या मुलांनी कासवाला जाळ्यातून सोडाऊन पुन्हा समुद्रात सोडले.