एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरानजीकच्या काळबादेवी येथील रस्त्यावर एसटी निष्काळजीपणे चालवून चालकाने दुचाकी व घराचा बांध तोडून नुकसान केले. या प्रकरणी संशयित एसटी चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण कुंडलिक फड (वय ४३, रा. द्वारकानगर, महालक्ष्मीनगर, रत्नागिरी) असे संशयित एसटी चालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १४) रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी यांच्या अंगणासमोरुन जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित लक्ष्मण फड हे एसटी (क्र. एमएच-२०बीएल १५८१) ही घेऊन रत्नागिरी ते काळबादेवी असे जात असताना एसटी निष्काळजीपणे चालवून फिर्यादी स्नेहल सुनिल वारेकर (वय ३६, रा. नवानगर, काळबादेवी, रत्नागिरी) यांच्या घरासमोरील बांध व पार्क केलेली दुचाकी (क्र. एमएच-०८ एके ९७८५) हीचे नुकसान केले. या प्रकरणी स्नेहल वारेकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.