रत्नागिरी:- काळबादेवी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच पद भाजपाकडे आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. सरपंचपदी भाजपाच्या तृप्ती पाटील तर उपसरपंच पदी भाजपाचे सुमित सुधीर भोळे विराजमान झाले आहेत.
काळबादेवी सरपंच निवडीबाबत सस्पेन्स होता. पहिल्या टप्प्यात तृप्ती पाटील या सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत तर उपसरपंच पदावर सुमित भोळे यांची नियुक्ती झाली आहे. सरपंच निवडीनंतर माजी आमदार बाळ माने, माजी जिप उपाध्यक्ष सतिश शेवडे, राजेश मयेकर, अमित विलणकर, नित्यानंद दळवी, विनय मयेकर, बाबा घोडे, अमर कीर आदींनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचे अभिनंदन केले. यावेळी नवनियुक्त सदस्य उपस्थित होते.