रत्नागिरी:- चक्कर आलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. भारती प्रभाकर कांबळे (वय ६१, रा. म्हाडा कॉलनी, कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्धेचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १६) रात्री एकच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारती कांबळे यांनी अचानक चक्कर आली. तात्काळ आजुबाजूच्या लोकांनी तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर औषधोपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









