कारवांचीवाडी येथून चाळीस वर्षीय महिला बेपत्ता

रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत साई संकल्प नगर, आदर्श वसाहत कारवांचीवाडी येथून एक चाळीस वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. अनिता विजय ठाकूर असे या महिलेचे नाव आहे. या महिलेचे पती विजय पर्वत ठाकूर (वय-४५ वर्षे, रा. साई संकल्पनगर आदर्श वसाहत कारवांचीवाडी ता.जि.रत्नागिरी) यांनी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

अनिता विजय ठाकूर या दि.०६/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. साई संकल्पनगर आदर्श वसाहत कारवांचीवाडी येथुन सकाळी ११वा. चे दरम्याने कलावती आईंच्या दर्शना करीता जाते व दुपारी २.०० वा. पर्यत परत येते असे सांगुन घरातुन गेल्या होत्या, मात्र त्या अद्याप परत आलेल्या नाहीत. पती विजय पर्वत ठाकूर यांनी दिलेल्या माहितीवरून सदरचा नापत्ता रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे.

अनिता विजय ठाकूर, वय-४० वर्षे रा. साई संकल्पनगर आदर्श वसाहत, कारवांचीवाडी ता जि रत्नागिरी, रंग- सावळा, उंची ४.५ फट, केस काळे, बांधा मध्यम, बोलीभाषा मराठी, डोळे काळे, नाक सरळ, गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र, कानात -खोटे कानातले, नेसणीस आकाशी रंगाची साडी, लाल रंगाचा ब्लाउज, पायात पांढ-या रंगाची चप्पल, हातामध्ये दोन प्लास्टीक पिशव्या त्यामध्ये एक आकाशी रंगाचे भजनाचे पुस्तक

सदर महिला कोणाला आढळून आल्यास पोलीस नियंत्रण कक्ष -०२३५२-२२२२२२ रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे -०२३५२- २३०१३३ बी.एन. कदम पोहेकॉ. ९४२२९०११२२ यांच्याशी संपर्क करण्यात यावा असे पोलीस स्थानकातर्फे कळवण्यात आले आहे.