कारच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

फरार कार चालकावर गुन्हा दाखल

खेड:- मुंबई गोवा महामार्गावरील कळंबणी गावडेवाडी फाटा येथे चालत जाणाऱ्या तरुणाला कारने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना 21 मार्च रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. नारायण दगडु शिगवण (३६ वर्षे रा. कळंबणी गावडेवाडी ता. खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर मदत न करता कार चालक फरार झाला.

याबाबतची फिर्याद मयत तरुणाचे काका जनार्दन सोनु शिगवण यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञात कार चालकावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम. १०६(१), २८१,१२५ (अ) (ब), सह मोटार वाहन कायदा कलम १३४ (अ) (ब),१८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे, मयत पुतण्या नारायण शिगवण हा हायवे रोडने पायी चालत जात असताना त्याला कोणत्यातरी अज्ञात चारचाकि (कार) वाहनावरिल अज्ञात चालकाने जोरदार ठोकरुन अपघात करुन त्याचे डोक्याच्या गंभीर दुखापतीस व मरणास कारणीभूत ठरला. अपघात झाल्यानंतर तेथे जखमीला वैद्यकिय मदत न करता पळून गेला. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.