कागल येथील विद्यार्थ्यांचा हतिवले येथे अपघाती मृत्यू

रत्नागिरी:- बांद्री-कागल (ता. कोल्हापूर) येथील लांजा येथे एमएएस्सी चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा हतिवले (ता. राजापूर) येथील रस्त्यावर अपघात झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालय राजापूर येथे दाखल केले होते. अधिक उपचारसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रसाद शितल परिट (वय २३, रा. बांद्री, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी चार ते पाच च्या सुमारास हातिवले-राजापूर येथे घडली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद परिट हा आपल्या दुचाकीवरुन मुंबई-गोवा महामार्गावरुन जात असताना हातिवले रस्त्यावर त्याचा अपघात झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान त्याचा सायंकाळी सातच्या सुमारास मृत्यू झाला. या बाबत माहिती मिळताच त्याचा मित्र परिवार व लांजा येथील शिक्षकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. मात्र त्याचा अपघात कसा झाला या बाबत माहिती मिळू शकली नाही. या अपघाताबाबत जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.