रत्नागिरी:- छातीत कळ येऊन बेशुद्ध पडलेल्या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. नंदा संजय वाडकर (वय ४६, रा. कसोपसडा, कसोप रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २) सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदा वाडकर यांना प्रेशर व थायरॉईडच्या त्रासाने त्रस्त होत्या. रविवारी घरी जात असताना अचानक त्यांच्या छातीत कळ येऊन बेशुद्ध पडल्या. उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेण्यात आले होते. तेथून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.