पं. स. शिक्षण विभाग, कोमसाप शाखा मालगुंड व कवी केशवसुत स्मारक मालगुंड यांचे संयुक्त आयोजन
गणपतीपुळे:- शिक्षण विभाग पंचायत समिती रत्नागिरी,कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड आणि कवी केशवसुत स्मारक मालगुंड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम रविवारी मालगुंड येथे कविवर्य केशवसुत स्मारकात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आणि रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांची उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली. तर हा संपूर्ण कार्यक्रम रत्नागिरी पंचायत समितीच्या सभापती संजना माने यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली अतिशय नेटक्या नियोजनात पार पाडण्यात आला.
या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी सकाळ सत्रात ग्रंथ दिंडी ग्रामपंचायत मालगुंड कार्यालयापासून कवी केशवसुत स्मारकापर्यंत मोठ्या उत्साहात वाजतगाजत ढोलताशांच्या गजरात आणि सजवलेल्या पारंपरिक विविध आकर्षक वेशभूषद्वारे विद्यार्थी,शिक्षक,मान्यवर,साहित्यप्रेमी,स्थानिक ग्रामस्थांच्या मोठ्या सहभागात काढण्यात आली. यावेळी मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाची ही ग्रंथदिंडी उपस्थित सर्वांची खास आकर्षण ठरली. या मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचे हस्ते कवी केशवसुत आणि सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोमसापचे प्रमुख विश्वस्त रमेश कीर , कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष तथा भाषा विकास समितीच्या सदस्या नमिता कीर , कोमसापचे सल्लागार तथा मार्गदर्शक अरुण नेरुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत , रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप तथा बंड्या साळवी रत्नागिरी पंचायत समितीच्या सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत सावंत, मालगुंड कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील,कोमसाप मालगुंड शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सदस्या साधना साळवी,मालगुंडचे सरपंच दीपक दुर्गवळी,रत्नागिरी पंचायत समिती सदस्य उत्तम मोरे, कोमसापचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष शशांक पाटील, युवाशक्ती जिल्हा दक्षिण रत्नागिरी जिल्हाअध्यक्ष अरुण मोर्ये, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय पोकळे, गटशिक्षणाधिकारी सुनील पाटील, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सदस्य सर्व विस्तार शिक्षण अधिकारी सर्व केंद्रप्रमुख तसेच साहित्यप्रेमी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत कवी केशवसुत मालगुंड समितीचे अध्यक्ष तथा रत्नागिरी पंचायत समितीचे सदस्य गजानन तथा आबा पाटील व कोमसाप मालगुंड शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर व इतर सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देताना मराठी भाषेचा भाषेचा प्रत्येक मराठी माणसाने योग्य प्रकारे वापर करून मराठी भाषा कायमपणे वृद्धींगत करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत असे आव्हान केले. त्यानंतर या मराठी राजभाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात दुपारी 12 ते 1 या वेळेत मराठी भाषा विकासासाठी शासनाचा दृष्टिकोण साहित्यिकांच्या अपेक्षा आणि वास्तव परिस्थिती या विषयावर परिसंवाद घेण्यात आला यामध्ये नाटककार तथा कोमसापचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी संवादक म्हणून काम पाहिले या संवादात मराठी भाषा विकासासाठी शासनाच्या दृष्टिकोने यावर आपली मतं नोंदवता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत , कोमसापचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर, पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा कृ सोमण ,सेसार बोर्डाचे सदस्या डॉ. अरुंधती भालेराव यांनी विशेष सहभाग घेत हा कार्यक्रम यशस्वी केला. यानंतर दुपारच्या कार्यक्रमात निमंत्रित शिक्षकांचे कविसंमेलन आणि महाराष्ट्राच्या लोकधारेवर आधारित समूह लोक नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील विविध केंद्रातून शिक्षक संघांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर सायंकाळी पुरस्कार वितरण व बक्षीस समारंभ समारंभ समारंभ समारंभ विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थित संपन्न झाला. त्यानंतर कोमसाप शाखा मालगुंड युवाशक्तीच्या प्रमुख स्मिता बापट यांच्या पसायदानाने संपूर्ण मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विस्तार अधिकारी (शिक्षण विभाग ) सर्व केंद्रप्रमुख, सर्व शिक्षा अभियान कर्मचारी, शिक्षण समन्वय समिती रत्नागिरी, सर्व शिक्षक संघटना तालुका रत्नागिरी ,सर्व कार्यकारणी सदस्य कोमसाप मालगुंड शाखा, सर्व सदस्य कवी केशवसुत स्मारक समिती मालगुंड यांचे विशेष सहकार्य लाभले .