कर्ज देण्याच्या नावाखाली तब्बल एक लाखाला गंडवले

रत्नागिरी:- बजाज फिनसर्व मधून लोन मिळवून देतो असे सांगत तरुणाला तब्बल एक लाख आठ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. तरुणाकडून ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करून घेत लोन न मिळाल्याने तरुणाने अखेर ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. 

तालुक्यातील खालची गोताड वाडी खालगाव जाकादेवी येथे राहणाऱ्या अमोल रघुनाथ गोताड (32) याने अंशुमन साहू नामक आरोपी विरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत अमोल याची फसवणूक करण्यात आली आहे. 

यातील आरोपी साहू याने फिर्यादी अमोल याला बजाज फिनसर्वचे नावाने पर्सनल लोन मंजुर करुन देतो असे खोटे सांगुन वरील तारखेस वेळी व जागी फिर्यादी याचे मो नं वरून वेळोवेळी आरोपीत याचा मो.नं वर फोन करुन रक्कम रु .१,०८,६१० / – रु.टप्प्याटप्याने ऑनलाईन पद्ध्तीने ट्रान्सफर करण्यास सांगितले. फिर्यादी अमोल याने रक्कम ट्रान्सफर केली असता फिर्यादी यास कोणत्याही प्रकारचे लोन मंजुर न करता तसेच फिर्यादी याने भरलेले पैसे परत न करता फिर्यादी यांची फसवणुक केली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.