कम्युनिटी सेंटरच्या नावाने बौद्धविहार बांधण्यास समाजाचा विरोध

बौद्धविहार संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा

रत्नागिरी:- थिबा कालीन बौद्धविहार परिसरात उभाण्यात येणाऱ्या कम्युनिटी सेंटरवर बौद्धविहार उभारले जात असल्याचा खोटा प्रचार करण्यात येत आह़े. शासनाच्या कागदावर कम्युनीटी सेंटर अशीच नोंद आह़े. त्यामुळे कम्युनीटीसेंटरचे नाव पुढे करुन बौद्धविहार उभारण्याला बौद्धसमाजाचा विरोध आह़े. तसेच उच्च न्यायालयाचा दाखल देत काही जण समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत़. मात्र समाजाची भुमिका स्पष्ट बौद्धविहाराच उभे राहिले पाहिज़े त्यासाठी शासनाने सबंधित जागा समाजाच्या ताब्यात द्यावी अशी मागणी थिबा राजा कालिन बौद्धविहार बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अनंत सावंत यांनी केल़ी.

शासकीय विश्रामगृह माळनाका येथे आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होत़े. अनंत सावंत यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाने कम्युनिटी सेंटर विरोधातील याचिका फेटाळली असा दावा केला जात आह़े. त्याचप्रमाणे बांधकाम संदर्भात असलेली स्थगिती उठविण्यात आली असल्याचे सांगितले जात आह़े. प्रत्येक्षात जिल्हा न्यायालयाने अद्याप स्थगिती उठविलेली नाह़ी. त्यामुळे विनाकारण काही जणांकडून गैरप्रचार करुन समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आह़े.

थिबा कालीन बौद्धविहाराची जागा बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत आह़े. शासनाने ही जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात दिल्यास याठिकाणी समाज बौद्धविहार उभे करु शकत़ो मात्र असे न करता कम्युनिटी सेंटर उभे केले जात आह़े. त्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजी आह़े. काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी कम्युनिटीसेंटरच्या नावाने बौद्धविहार उभारले जाणार असल्याची घोषणा केल़ी मात्र समाजाला हे मान्य नसून आम्हाला केवळ बौद्धविहारच हवे आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाह़ी.

यावेळी समितीचे सल्लागार दिवेन कांबळे यांनी सांगितले की, कम्युनिटी सेंटरमध्ये एक सभागृह, वाचनालय व संग्राहालय असे स्वरुप ठेवण्यात आले आह़े. त्यामुळे ते बौद्धविहार कसे काय होवू शकत़े. बौद्धविहार हे धार्मिक स्थळ असून त्याची एक पवित्रता असल्याने आमचा कम्युनीटी सेंटरला विरोध असल्याचे सांगितिल़े. पत्रकार परिषदेल़ा थिबाराजा कालीन बौद्धविहार बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष एल़ व्ह़ि पवार, शिवराम कदम, ब़ी क़े कांबळे, चंद्रकांत जाधव, अजित जाधव, प्रदीप पवार, रुपेश कांबळे, दीपक जाधव, धीरज पवार, रत्नदीप कांबळे, केतन पवार, राजन जाधव, संजय आयरे, दीपक पवार आदी उपस्थित होत़े.