रत्नागिरी:- कदम फाउंडेशन अपेडे संस्थेकडून महिला समूह गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन गटात ही स्पर्धा होणार आहे.
दोन गटात होणार्या या स्पर्धेच्या पहिल्या गटासाठी भजन व देशभक्तीपर गीत हा विषय असणार आहे तर दुसर्या गटासाठी स्फूर्तीगीत व लोकगीत हा विषय ठेवण्यात आला आहे. ही स्पर्धा फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांसाठी ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी वयोगट 18 वर्षे आणि त्यावरील ठेवण्यात आला आहे. स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नसल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. ज्या महिलांना स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी आपल्या गटानुसार विषय निवडावे तसेच सादर करण्यात येणारे गीत मराठी माध्यमात असावे असे बंधनकारक असणार आहे. गायनाचे व्हिडिओ किमान 3 मिनिटांचे असावे. फक्त समूह गायनच ग्राह्य धरले जाईल. प्रत्येक समूहात किमान 5 स्पर्धक असावे. प्रत्येक गटाला प्रमाणपत्र मिळेल तसेच गटात प्रथम क्रमांक विजेत्याला 3000/-रु, द्वितीय 2000/-रुपये तर तृतीय क्रमांक विजेत्याला 1000/- रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीची अंतिम तारीख 13 मार्च 2022 असून या स्पर्धेत नोंदणी करण्यासाठी https://forms.gle/BpYsSvotM66YzW616 ही लिंक देण्यात आली आहे. व्हिडिओ सबमिशनची अंतिम तारीख 19 मार्च 2022 असून व्हिडिओ सबमिशनसाठी दुसरी लिंक मोबाईल नंबरद्वारे किंवा तुमच्या ईमेल आयडीद्वारे तुम्हाला शेअर केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी 9172121157 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.