रत्नागिरी:- शहरातील एमआयडीसी-मिरजोळे येथील महिलेने कंम्फर्ट लिक्वीड प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. क्रांती सुरेश लोहार (वय २९, रा. एमआयडीसी-मिरजोळे) असे कंम्फर्ट लिक्विड प्राशन केलेल्या महिलेचे नाव आहे.
ही घटना रविवारी (ता. २३) दुपारी चारच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिलेने अनावधानाने कंम्फर्ट लिक्विड प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्याने तिला नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.