कंटेनर-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार ठार 

दापोली:– कंटेनर-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. दापोली-खेड मार्गावरील नवशी फाटा येथे सकाळी हा अपघात झाला. अपघातामध्ये ठार दुचाकीस्वार कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. 

दापोली तालुक्यातील टेटवली येथील कदम वाडीतील सुरेश कात्रे (वय 45) हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील हॉर्टीकल्चर विभागात कामाला होते. सोमवारी सकाळी विद्यापीठात निघाले असता कुंभवे नदी पुलावरून जात असता हा अपघात घडला. त्यांच्या पुढे पूर्ण क्षमतेने भरलेला एक कंटेनर खेडकडून दापोलीकडे जात होता. हा कंटेनर चढामध्ये बंद कडून उलट्या दिशेने मागे आला. या कंटेनरच्या मागून सुरेश कात्रे हे आपली मोटरसायकल घेऊन दापोलीकडे येत होते. त्यांना त्यांना मागे येणाऱ्या कंटेनरखाली ते चिरडले गेेलेे.