औषध दुकाने वगळून अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आज बंद राहणार

किराणा दुकाने फक्त घरपोच सेवा देणार

रत्नागिरी:- रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज केवळ मेडिकल दुकाने सुरू राहतील. किराणा दुकानदारांना घरपोच सेवा देण्यास मुभा देण्यात आली आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, तरी देखील काही ठिकाणी या नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूीवर आता रत्नागिरीत कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता रत्नागिरी तालुक्यात अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता रत्नागिरीत किराणा, भाजी आणि दूध घरपोच पोहोचवले जाईल. तसेच आता जर दुकाने सुरु ठेवली तर त्या दुकानांवर कारवाई केली जाईल, असा इशारा रत्नागिरीच्या तहसीलदारांनी दिला आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १४ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, कडक निर्बंध असताना देखील राज्यातील काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर आता रत्नागिरी तालुक्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसात रत्नागिरीत मोठ्या संख्येने कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वाढ झालेली यला मिळाली. गेल्या दोन दिवसांचा आकडा पाहिला तर ४०० च्यावर असून यातील सर्वात अधिक रुग्ण हे रत्नागिरी तालुक्यातील आहेत.