ओझरखोल येथे मिनीबस- एसटीच्या भीषण अपघातात 19 जखमी

संगमेश्वर:- मुंबई गोवा महामार्गावरील ओझरखोल येथे मिनीबस आणि एसटी यांच्यात गुरुवारी सायंकाळी 5 वाजता भीषण अपघाता झाला. चिपळूणहून रत्नागिरीला येणारी मिनी बस आणि रत्नागिरीहून चिपळूणच्या दिशेने जाणारी बस यांच्यात समोरासमोर ठोकर झाली. अपघातात एकूण 19 जण जखमी आहेत.

अपघाताची भीषणता एवढी होती की मिनी बस चा दर्शनी भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. चालक यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. तो मिनी बसमध्ये अडकून पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर 1 तासाने त्याला बाहेर काढण्यात यश आले. अपघातात एकूण 19 जण जखमी आहेत. यामध्ये एस. टी मधील 6 जण तर मिनी बस मधील 13 जण जखमी झाले आहेत. मुंबई गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे निदर्शनास येत आहे.

ज्या ठिकाणी डायव्हर्जन आवश्यक होते त्या ठिकाणी ते न घातल्यामुळे हा अपघात झाला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघात झाल्यानंतर ठेकेदार कंपनीला जाग आली असून आता कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

या अपघातात विजय विश्वनाथ प्रसादे (60, रामपेठ, संगमेश्वर), अजय रामदास भालेराव (40, एस. टी. चालक, सध्या चिपळूण, मूळ जळगाव ), रघुनाथ दत्तात्रय फाटक (34, कसबा, संगमेश्वर), अमृता श्रीकांत साठे (52, चिपळूण, एस. टी बस), आहरत संतोष सावंत (15, पाली), आण्णा बाबासाहेब पवार (33, पाली, मराठवाडी, रत्नागिरी), सुशील धोंडीराम मोहिते (35, वांद्री, संगमेश्वर), सविता धोंडीराम मोहिते (65, वांद्री, संगमेश्वर), सहारा हमीद फकीर (22, शेट्येनगर, रत्नागिरी), केतन श्रीकृष्ण पवार (34, कुवारबाव, जागुष्ट कॉलनी, रत्नागिरी), शेखर सतीश साठे (32, डिप्लोमा फायरमन, रत्नागिरी), सिद्धार्थ गोपाळ सावंत (74, पाली, वळके,रत्नागिरी), अनिरुद्ध शिवाजी धनावडे (53, मारुती मंदिर, रत्नागिरी), अंकिता अनंत जोगळे (40, माखजन, संगमेश्वर), वैशाली सिद्धार्थ सावंत (60, पाली वळके), उमर आफ्रिन मुलानी (25, कसबा, संगमेश्वर) हे लोक जखमी झाले आहेत.

मिनी बस चालक गंभीर असल्याने त्याला रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे. तर अन्य दोघांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची नावे समजू शकलेली नाहीत.