एस.टी. बसस्थानक, पिकअपशेडचे सॅनिटाईझेशन

युवासेना सरसावली; साळवी, दुडे यांचा उपक्रम

रत्नागिरी:- दसरा, दिवाळीला रत्नागिरीसारख्या मध्यवर्ती शहरात सणासुदीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होणार हे निश्‍चित. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर रत्नागिरीकरांच्या सुरक्षिततेसाठी युवासेना सरसावली आहे.

युवासेना तालुका युवाधिकारी तुषार साळवी, शहर युवाधिकारी अभिजीत दुडे यांनी ही संकल्पना राबवण्यासाठी पावले उचलली आहेत. दसर्‍याच्या पुर्वसंध्येला रत्नागिरीतील सर्व पिकअपशेड, दोन्ही बसस्थानक परिसर सॅनिटाईज केला आहे. विविध सामाजिक उपक्रम राबविणार्‍या युवासेनेने पुन्हा एकदा शहरवासीयांसाठी मोक्याच्या क्षणी उपक्रम हाती घेतला.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेना तालुकाप्रमुख तथा नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम युवासेना रत्नागिरीने हाती घेत यशस्वीपणे राबविला.

कोरोनाने रत्नागिरीत चांगलेच थैमान घातले आहे. ऐन गणेशोत्सवामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात सापडू लागले होते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी टाळेबंदीचा उपाय लागू करण्यात आला. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा जोर ओसरु लागला, पण भिती अजुनही कायम आहे. या आजारावर औषध नसल्यामुळे मास्क, हातांची स्वच्छता यावर प्रत्येक नागरिकाने भर देणे एवढेच महत्त्वाचे आहे. शासनाकडून प्रचार, प्रसार सुरु असतानाच रत्नागिरीतील युवासैनिकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.

दसरा, दिवाळीच्या निमित्ताने अनेक लोक खरेदीच्या निमित्ताने रत्नागिरी शहरात दाखल होणार आहेत. एसटीसह खासगी गाड्यातून प्रवास सुरु असल्याने गर्दी दिवसेंदिवस वाढणार आहे. कोरोना काळात तुषार साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली विविध सामाजिक उपक्रम हाती घेत युवासैनिक कोविड योध्दे बनलेले होते. 

त्याच धर्तीवर युवासेना रत्नागिरीने आरोग्य हितासाठी साळवी स्टॉप ते रहाटाघर या मार्गावर येणारी सर्वच्या सर्व पिकअपशेड, रहाटघर व मध्यवर्ती एस टी बस स्थानक, नियंत्रण कक्ष, शौचालये, एसटी पास वितरण खिडकी, आरक्षण खिडकी यासह सर्व परिसर सॅनिटाईज केला. गावातील अनेक लोक या ठिकाणी ये-जा करतात. त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. एका दिवसात सर्वच्या सर्व पिकअपशेड स्वच्छ केली. त्यामुळे नागरिकांमधूनही समाधान व्यक्त केले जात असून या आगळ्या-वेगळ्या उपक्रमांबद्दल धन्यवाद दिले जात आहेत.हा उपक्रम राबवित असताना शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, रत्नागिरी एस.टी आगार व्यवस्थापक अजयकुमार मोरे साहेब, देवदत्त पेंडसे, विकास सनगरे, अजिंक्य सनगरे,रोहित मायनाक, मेहुल जैन, रितेश साळवी, राजेश तुलसंकर, इफराज धर्मे, नूरमोहमद पावसकर, राजस कदम, सन्नन वस्ता, सर्वेश शेलार, युवराज शेट्य, दर्शन रेडीज ,फरहान मुल्ला ,अथर्व पंगम, लोभस देसाई आदी सहभागी झाले होते.