राजापूर:- शुक्रवारी ओणी पाचल मार्गावर पाचल कडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या आजिवली रत्नागिरी एस.टी. बस व दुध वाहतुक करणारा आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात प्रकरणी राजापूर पोलीसांनी टेम्पो चालक टेम्पो चालक बाळाप्पा रामचंद्र हगेद याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एस.टी. बस चालक आर. एच. देशमुख यांनी राजापूर पोलीसांत तक्रार दिली आहे.
राजापूर आगाराची आजिवली रत्नागिरी ही बस (क्रमांक एम. एच. २० २२७१) ही घेऊन चालक आर. एच. देशमुख व वाहक विजय शिंदेदेसाई हे आजिवलीकडून पाचलमार्गे रत्नागिरीकडे जात असताना गाडी सौंदळ पाटीलवाडी येथील वळणावर चढावात असताना समोरून दुधाने भरलेला आयशर टेम्पो क्रमांक एम. एच. ०९ जीजे ३८८० हा भरधाव वेगाने आला, यावेळी टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने समोरून येणाऱ्या एस.टी. बसला जोरदार धडक दिली. व पुढे जाऊन हा टेम्पो रस्त्याच्या बाजुला कोसळला. तर टेम्पोची जोरदार धडक बसल्याने एसटी बसही रस्त्याच्या साईटपट्टीच्या खाली कलंडली व हा अपघात झाला. या अपघातात चालक वाहकासह काही प्रवाशी जखमी झाले होते.
या प्रकरणी राजापूर पोलीसांना टेम्पो चालक बाळाप्पा रामचंद्र हगेद वय ५५ रा. कणेरी ता करवीर जि कोल्हापुर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या ताब्यातील टेम्पो हयगयीने, निष्काळजीपणे व अतिवेगाने चालवुन एस टी बसला ठोकर देवुन अपघात केला. व एस टी मधिल प्रवाशांच्या तसेच आयशर टेम्पो मधिल प्रतिक तनाजी संकपाळ यांच्या लहानमोठ्या दुखापतीस व दोन्ही गाडीचे नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.