संगमेश्वर:- देवरुख- संगमेश्वर एसटीबस दरीत उलटून झालेल्या अपघातात ११ प्रवासी जखमी झाले. हा अपघात करंबेळे येथील संजय महाडिक यांच्या घरानजीक आज घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची परिसरात चर्चा सुरू होती. अपघातातील जखमींची नावे
दूर्वा मनोज गोसावी (वय २८, रा. मुचरी गोसावी वाडी), संतोष रावजी कुवळेकर (५५, रा. निवळी), सुगंधा रघुनाथ सोलकर (५०, रा. लोवले पडयेवाडी), सायली संजय गुरव (३५, रा. पिरंदवणे), काव्या संजय गुरव (१४ वर्षे,) शिवाजी सीताराम पवार (६९, रा. कारभाटले), अभिजित धोंडिराम येडके (रा. देवरुख), रमाकांत रामदास दुर्गवले (१८, रा. मुर्तवडे), अर्चना अशोक ओक (रा. चिपळूण), वैशाली विष्णू पडवेकर (रा. फणसवणे), अमृता आशिष भिडे (३९) अशी आहेत.
देवरुख – संगमेश्वर राज्यमार्गावर देवरुखातून सुटलेली एसटीबस गाडी ही ३.३० ला देवरुखहून संगमेश्वरला जात असताना बसचालक निळोबा मुंडे याचे बसवरील नियंत्रण सुटला. त्यामुळे बस करंबेळे मोरीच्या पुढील बाजुस संजय महाडिक यांच्या कंपाउंड मध्ये रस्ता सोडून २० फूट खोल दरीत जाऊन कोसळली. जखमींना ग्रामस्थांनी शिडीच्या सहाय्याने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तत्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी देवरुख आणि संगमेश्वर पोलिस स्थानकाच्या पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली.









