एसटी आगार व्यवस्थापकांकडून महिला कर्मचाऱ्याला अश्लिल शिवीगाळ

रत्नागिरी:- एसटी आगार व्यवस्थापकांकडून महिला कर्मचाऱ्याला अश्लिल शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रत्नागिरी एसटी आगार व्यवस्थापक संदीप पाटील (रा. माळनाका, रत्नागिरी) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ४० वर्षीय विवाहित महिला ही रत्नागिरी एसटी विभागात लिपिक म्हणून काम करते. ४ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ३ च्या सुमारास पीडित महिलेला आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी केबीनमध्ये बोलावून घेतले. यावेळी कामगार संघटनेच्या पुढाऱ्यांसमोर संदीप पाटील याने पीडित महिलेला अश्लिल शिवीगाळ केली. तसेच ११ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ च्या सुमारास महिला कर्मचाऱ्यांसमोर अश्लिल शिवीगाळ करत मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, अशी तक्रार पीडित महिला कर्मचाऱ्याने रत्नागिरी शहर पोलिसांत दाखल केली.