रत्नागिरी:- मत्स्यव्यवसाय विभागाची गस्ती नौका रामभद्र गस्त घालत असताना 11 सागरी मैलाच्या दरम्यान एल.ई.डी. लाईट मासेमारी करणाऱ्या 2 नौका अरशद अ. लतीफ पावसकर यांची नौका “साद माज” (क्र. IND-MH-4-MM-3731), आणि लियाकत मस्तान यांची नौका “सुभान सफवान” (क्र. IND-MH-4-MM-998) या दोन नौका एल.ई.डी. साहित्यासह आढळून आल्या. दोन्ही नौकांसह 20 लाखांचे मालमत्ता विभागाकडून जप्त करण्यात आली.
रत्नागिरी किनारपट्टीवर परप्रांतीय मासेमारी नौका तसेच एल.ई.डी. मासेमारी नौका कार्यवाही अनुषंगाने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी कालच मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाची आढावा बैठक घेऊन पर्ससीन व एल.ई.डी. या दोन्ही प्रकारच्या मासेमारीवर अंकुश आणण्याच्या दृष्टीने विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या सूचनांची सक्त अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने विभागाची गस्ती नौका “रामभद्र” (क्र. IND-MH-4-MM-5806) गस्ती कामी काल रात्रीच रवाना करण्यात आली.
गस्ती दरम्यान 11 सागरी मैलाचे दरम्यान एल.ई.डी. लाईट मासेमारी करणाऱ्या 2 नौका अनुक्रमे अरशद अ. लतीफ पावसकर यांची नौका “साद माज” (क्र. IND-MH-4-MM-3731), आणि लियाकत मस्तान यांची नौका “सुभान सफवान” (क्र. IND-MH-4-MM-998) या दोन नौका एल.ई.डी. साहित्यासह आढळून आल्या. या दोन्ही नौका आज सकाळी मिरकरवाडा बंदरात आणण्यात आल्या असून सागरी कायद्याअंतर्गत प्रतिवेदन दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. दोन्ही नौकेवरील एल.ई.डी. लाईट व जनरेटर नौकेसहीत जप्त करण्यात आले असून दोन्ही नौकेवरील एल.ई.डी. लाईट्स व जनरेटर यांची सुमारे प्रत्येकी रु. 10 लाख किंमत धरुन दोन नौकेवरील एकूण रु. 20 लाखाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मच्छीमारांनी कोणत्याही प्रकारे अनधिकृत एल.ई.डी. लाईटचा वापर मासेमारीसाठी करु नये. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नौकांना कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.