एमआयडीसी येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- थंडी, तापाने आजारी असलेल्या प्रौढाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारापुर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. धिरेश्वर गिरीन ब्रह्मा (वय ५४, रा. काटाजहर, ता. गोवर्धना, जि. बक्सा, राज्य आसाम. सध्या एमआयडीसी मिरजोळे-रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ३) रात्री साडेअकराच्या सुमारास एमआयडीसी येथील साई हॉस्पिटल येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार धिरेश्वर ब्रह्मा यांना दोन ते तीन दिवस थंडी व ताप भरुन येत होता. मेडिकल मधून औषध घेऊन ते रुमवर विश्रांती घेत होते. नैनेश विलास लकेश्री यांनी त्यांना आवाज दिला असता काहीच बोलत नसल्याने त्यांनी एमआयडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापुर्वीच ते मृत झाले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.