एक पोलीस कर्मचारी, डॉक्टरसह रत्नागिरी तालुक्यात 14 नवे कोरोनाग्रस्त 

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार तालुक्यात तब्बल 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले आहेत. यात एक पोलीस कर्मचारी तर एका डॉक्टरचा देखील समावेश आहे. याशिवाय गोळप येथील एका 18 महिन्यांच्या बाळाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. 
 

झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमूळे रत्नागिरी तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. अशातच कोरोना योद्ध्यांना कोरोनाची लागण होत असल्याने या चिंतेत अधिक भर पडत आहे. 
 

दरम्यान सोमवारी सायंकाळी आलेल्या अहवालात रत्नागिरी तालुक्यातील 14 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात शहर पोलीस स्थानकातील एका पोलीस कर्मचाऱ्यासह नाचणे येथील एका डॉक्टरचा समावेश आहे. याशिवाय आठवडा बाजार, गवळीवाडा (दोन्ही सिविल ऍडमिट), गोळप, खेडशी महालक्ष्मी, आंबेकरवाडी, मारुती मंदिर, थिबा पॅलेस, राजीवडा, हातखंबा 2 आणि खेडशी येथे नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.