रनपचे सफाई कर्मचारी आक्रमक; माफीनाम्यानंतर कर्मचारी शांत
रत्नागिरी:- पालिकेच्या सफाई कामगाराला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी उघडकीस आला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याने ही मारहाण केली. फोन न उचलण्यावरून राजवाडा येथे हा मारहाणीचा प्रकार घडला. या घटनेनंतर संतापलेल्या सफाई कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. मात्र उबाठाचे पदाधिकारी, मुख्याधिकारी यांनी मध्यस्थी करून उबाठ्याच्या त्या कार्यकर्त्यांने लेखी माफी नामा दिल्यानंतर प्रकरण नितळले आणि कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले. भविष्यात असे काही केले तर याद राख, नोकरीचा विचार करणार नाही. काय व्हायचे ते होऊदे, अशा शब्दात संतप्त कर्मचारी, अधिकाऱ्यांनी उबाठाच्या त्या कार्यकर्त्याला सुनावले.
पालिकेच्या सफाई कामगारांचे मुकादम मनोहर कदम राजीवडा येथे सफाई कामासाठी गेले होते. तेथील उबाठाचे कार्यकर्ते साजिद पावसकर हे त्यांना फोन करत होते. पंरतु त्यांनी फोन उचलले नाही, यामुळे पावसकर संतापले होते. या दरम्यान कदम राजीवडा येथे गेल्यानंत कदम आणि पावसकर आमने-सामने आले. दोघांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक उडाली. याचे पर्यवसान हाणामारीत झाले. साजित पावसकर याने कमद यांना मारहाण केली. शासकीय काम करत असताना मारहाण केल्यामुळे पालिकेच्या कर्मचारी संघटनेने एकत्र येऊन कामबंद आंदोलन पुकराले. सर्व कर्मचारी वर्ग पालिकेत गोळा झाला. घडलेल्या घटनेचे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. पावसकर यांच्या नेहमीच्या अशा वागण्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप होता. पावसकर याला ताब्यात देण्याची मागणी कर्मचारी करत होते. परंतु उबाठाचे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे आणि मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी बोलून गुन्हा दाखल न करता काहीतरी तोडगा काढा, अशी विनंती साळुंखे यांनी केली. साळुंखे, साजित पावसकर हे मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये होते. अखेर पोलिस ठाण्याचे हेलपाटे पारण्यापेक्षा पावसकर यांनी लखी माफिनावा द्यावा, अशी मागणी सफाई कर्मचाऱ्यांनी केली. त्यानंतर साळुंखे यांनी समजावून सांगितल्यानंतर लेखी माफिनामा दिला. तसेच सर्व कर्मचाऱ्यांसमोर साजिद पावसकर यांनी मनोहर कदम यांची माफी मागितली.
पावसकर यांच्याकृतीने पालिका कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड चिड होती. जेव्हा हा विषय मिटविण्यात आला. तेव्हा पुन्हा एकदा साजित पावसकर यांना मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आले. तेव्हा मात्र अधिकाऱ्यांचे संयम सुटला. या कर्मचाऱ्यांमुळे आपले शहर स्वच्छ आहे. ते कोणत्या परिस्थितीमध्ये काम करतात हे सांगायची गरज नाही. सफाई कर्मचारी म्हणून त्यांना कोण वाली नाही, असे समजु नका. नोकरी गेली तर बेहत्तर पण पुन्हा असा प्रकार घडला तर त्याला जागा दाखवुन देऊ, असे अधिकाऱ्यांनी पावसकर यांना सुनावले.
माफीनाम्यानंतर पालिकेबाहेर घोषणाबाजी
पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर साजित पावसकर यांनी गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी त्या कर्मचाऱ्याची माफी मागितली. जाहीर माफी मागितल्यानंतर कर्मचारी एकजुटीचा विजय असो, अशा पालिकेच्याबाहेर घोषणा देऊन कर्मचारी कामाला निघुन गेले.