रत्नागिरी:- रत्नागिरीतील गावागावात सर्वत्र शिमग्याचा उत्सव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्योजक किरण उर्फ भय्या सामंत यांनी सहकुटुंब शहरानजीकच्या नाचणे गावातील नवलाई, पावणाई, जाकादेवी, महापुरुष या ग्रामदेवतेच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांनी उद्योजक भय्या सामंत यांच्या उज्ज्वल राजकीय वाटचालीसाठी ग्रामदेवतेकडे प्रार्थना केली.
ग्रामदेवतेचे दर्शन घेतल्या नंतर भय्या सामंत यांनी देवस्थानचे मानकरी तसेच नाचणे गावचे खोत सावंत कुटुंबीयांची घरी हजेरी लावली. यावेळी भय्या सामंत यांचा सावंत कुटुंबाकडून शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत माजी नगरसेवक सुदेश मयेकर, जीतू शेट्ये, ओमकार मोरे, यांच्यासह सावंत कुटुंबातील प्रदीप सावंत, राजीव सावंत, प्रतीक सावंत, नीलम सावंत, सागर सावंत आदी उपस्थित होते.