रत्नागिरी:- मागील आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. आता दहावी बोर्डाच्या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना होती. ती प्रतीक्षा संपली आहे. उद्या (शुक्रवार) 17 जून 2022 रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.
‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इयत्ता. 10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दिनांक 17 जून 2022 रोजी दुपारी 1:00 वाजता ऑनलाईन जाहीर होईल. अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 20 जून पर्यंत दहावीचा निकाल जाहीर होईल असे सांगण्यात आले होते. परंतु त्यानुसार उद्या म्हणजे 17 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होईल.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ –
http://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in