उद्यमनगर येथील फास्ट फूड सेंटरमध्ये सिलिंडरचा स्फोट

रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर येथील एका फास्ट फूड सेंटरमधील सिलिंडरचा गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. फास्ट फूड सेंटर बंद असल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी शहरातील नाक्यानाक्यावर उभ्या असलेल्या अनधिकृत फास्ट फूड व चायनीज सेंटरचा मुद्दा यानिमित्ताने समोर आला आहे. 

उद्यमनगर येथील फास्ट फूड सेंटर येथे रात्री गुरुवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने उद्यमनगर भाग हादरून गेला. अचानक झालेल्या स्फोटाने एकच गोंधळ उडाला. रात्री चायनीज सेंटर बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत जिवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

मात्र, यानिमित्ताने नाक्यानाक्यावरती उभ्या असणाऱ्या अनधिकृत खाद्य पदार्थाच्या विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका दुकानाच्या परवानगी घेऊन एकापेक्षा अधिक व्यवसाय सुरू केले जात आहेत.