रत्नागिरी:- शहरातील लेप्रेसी कॉलनी-उद्यमनगर येथील तरुणाने घरातील वाशाला ओढणीने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. आशिष रोहित माने (वय ३३, रा. लेप्रेसी कॉलनी, उद्यमनगर, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १८) सकाळी साडेपाचच्यापुर्वी निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तरुणाने अज्ञात कारणातून घरातील वाशाला गळफास घेतला. तात्काळ त्याला नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.









