उतारातील ट्रेलर पुढे सरकून दोन वाहनांना धडकला

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे उतारात उभा केलेला ट्रेलर अचानकपणे पुढे गेल्याने त्याची धडक बसून दोन वाहनांचे नुकसान झाले. ही घटना रविवार 17 ऑगस्ट रोजी रात्री 10.40 वा.सुमारास घडली. याप्रकरणी ट्रेलर चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल हरिव्दारी पाल (रा.रम्मुकापुरवा गयासपुर, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रेलर चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल रुपेश भिसे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री राहुल पालने आपल्या ताब्यातील ट्रेलर (एमएच-46-बीयु-2479) हा हातखंबा येथील ईश्वर ढाब्यासमोर उतारात उभा केला होता. परंतू त्याने ट्रेलर उभा करताना त्याचा हॅन्डब्रेक किंवा चाकांना स्टॉपर लावला नव्हता. त्यामुळे ट्रेलर उतारा पुढे जाउन त्याची (एमएच-08-बीई-4868) आणि (एमएच-05-डीएस-8891) या दोन वाहनांना धडक बसून त्यांचे नुकसान झाले. राहुल पालने इतरांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असा निष्काळजीपणा केल्याने त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 125,324(4) आणि मोटार वाहन कायदा कलम 126/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.