रत्नागिरी:- तालुक्यातील उक्षी येथे झालेल्या अपघात प्रकरणी बस चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकुमार रामसुरत जैसवाल ( ४३, रा. पोदी नं २ सेक्टर नं १६ न्यू पनवेल, जि. रायगड) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मारुती मंदिर ते मजगाव मार्गे उक्षी जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताने बस (क्र. एमएच-०२ ईआर ३३७५) ही उक्षी गावातील घोडखिंड येथील गराटेवाडीकडे जाणाऱ्या फाट्या पासून करबुडे ते उक्षी जाणाऱ्या घाटात बस निष्काळजीपणे चावलून बसचा ब्रेक फेल झाल्याचा बहाणा केला. त्यामुळे गाडीतील प्रवासी शुभम संजय कुंभारकर, संकेत पुडलीक देशेकर, मयुर शिवराम कुंभारकर, उमेश नारायण देशेकर यांनी गाडीतून उडी मारली यामध्ये शुभ कुंभारकर व संकेत देशेकर, मयुर कुंभारकर यांना गंभीर व किरकोळ दुखापत झाली. संशयित चालक बस कंट्रोल न झाल्याने घटातील वळणावर बस रस्त्याच्या उजव्या साईटला दरडीच्या भागावर आदळुन अपघात केला. यामध्ये बसचे नुकसान झाले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.