उंदिर मारण्याचे औषध प्राशन; महिला अस्वस्थ

रत्नागिरी:- तालुक्यातील चांदोर येथील नेपाळी महिलेने उंदिर मारण्याचे पावडर पाण्यात मिक्स करुन प्राशन केली. अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गिता प्रकाश जोशी (वय २३, रा. चांदोर, मुळ ः कैलाली-नेपाळ) असे उंदिर मारण्याची पावडर प्राशन केलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १६) पहाटे पाचच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेपाळी महिला गिता हिने उंदिर मारण्याची पावडर पाण्यात मिक्स करुन तिची चव बघण्यासाठी प्राशन केली. मात्र अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.