उंडीत मासेमारी करताना प्रौढाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील उंडी येथे मासेमारी करताना बुडून प्रौढांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास समोर आली. अरुण गणपत गावणकर (५६, रा. उंडी, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे.

अरुण हे उंडी समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी मासेमारी करताना अचानक बुडून त्यांचा मृत्यू झाला. १४ जुलै रोजी सकाळी त्यांचा मृतदेह स्थानिकांना आढळून आला. या घटनेची नोंद रत्नागिरी जयगड पोलिसात करण्यात आली आहे.