रत्नागिरी:-अतिवृष्टी आणि पूरस्थिती यामुळे अनेक भागात ई- पिक पाहणी रखडली असल्याने आता या योजनेला 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ई-पीक पाहणी प्राधान्याने राबविताना आता या योजनेत तांत्रिक कारणांनी अनेक शतेकर्यांचा सहभाग रखडलेला आहे.
शेतकर्यांना आपल्या पिकाची नोंद आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई-पीक पाहणी संकेतस्थळाच्या मदतीने करायची आहे. परंतु या मोहिमेला जवळजवळ दोन महिन्याचा कालावधी पूर्ण झाला. अद्यापही तीस टक्के शेतकरी या योजनेत सहभागी झालेले नाही. मध्यंतरी अतिवृष्टी आणि पावसामुळे नोंदणी करणे अवघड झाले होते. म्हणून 14 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली
होती.
याच दरम्यान शेतकर्यांनी वाढीव मुदतीचा फायदा घेतला. परंतु आता नवा हंगाम सुरू झाल्याने आता या योजनेला 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.









