रत्नागिरी:- ठाकरे गटाचे उपनेते आ. राजन साळवी यांच्या नव्या व जुन्या घराचे व हॉटेलची मोजमापे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी नोंदवून घेतली. याबाबतच अहवाल रायगड एसीबीला पाठवला जाणार आहे.
रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ठाकरे गटाचे उपनेते आ. राजन साळवी यांची चौकशी सुरु आहे. आ. साळवी यांच्यासोबत असणार्यांसह ठेकेदारांचीही चौकशी सुरु आहे. दरम्यान, लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांच्या सूचनेनुसार रत्नागिरीतील बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी सोमवारी प्रथम तेलीआळी येथील आमदार साळवी यांच्या जुन्या घराची व हॉटेलची मोजमापे घेतली. त्यानंतर खालचीआळी परिसरातील नव्या घराचेही मापे घेण्यात आली. यावेळी आ. साळवी यांचे मोठे बंधू दीपक साळवीही उपस्थित होते. या बाबतचा अहवाल बांधकाम विभाग एसीबी रायगडला पाठवणार आहे.









