आ. राजन साळवी चौकशीसाठी एसीबी कार्यालयात; शिवसैनिकांची कार्यालयाबाहेर मोठी गर्दी

रत्नागिरी:- आमदार राजन साळवी यांची सोमवारी एसीबी कार्यालयात चौकशी सुरु करण्यात आली. आमदार राजन साळवी एसीबी कार्यालयात हजर झाल्याची बातमी पसरताच शिवसैनिकांनी एसीबी कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली. बघता बघता मोठा जमाव एसीबी कार्यालयाबाहेर जमा झाला. या जमावा कडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. जमाव नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा फौजफाटा एसीबी कार्यालया बाहेर जमा करण्यात आला होता.