आशांना सात हजारांची मानधन वाढ, दिवाळीला दोन हजार भाऊबीज

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून घोषणा

रत्नागिरी:- महाराष्ट्रातील सर्व आशा महिलांना दरमहा मानधनांमध्ये 7 हजार रुपये वाढ म्हणजेच त्यांना राज्य शासनाचे 12 हजार रुपये व केंद्र शासनाचे तीन हजार रुपये असे 15 हजार रुपये दरमहा मानधन मिळणार आहेत. त्याशिवाय 78 कामांना कामावर आधारित मोबदला जादा स्वतंत्र मिळणार आहे. तसेच या दिवाळीच्या वेळेस प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज बोनस म्हणून मिळणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे.

महाराष्ट्रामध्ये 70000 आशा व गटप्रवर्तक महिला मागील पंधरा दिवसापासून बेमुदत संपावर आहेत. या संदर्भात बुधवारी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींच्या बरोबर बैठक घेऊन पुढील प्रमाणे निर्णय घोषित केलेला आहे. परंतू गटप्रवर्तक महिलांना इतर कंत्राटी कर्मचायाप्रमाणे लाभ देण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कामगार संघटना संयुक्त कृती समितीची करीत बैठक होऊन त्यामध्ये बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रातील सर्व आशा महिलांना दरमहा मानधनांमध्ये सात हजार रुपये वाढ म्हणजेच त्यांना राज्य शासनाचे 12 हजार रुपये व केंद्र शासनाचे तीन हजार रुपये असे पंधरा हजार रुपये दरमहा मानधन मिळणार आहे. त्याशिवाय 78 कामांना कामावर आधारित मोबदला जादा स्वतंत्र मिळणार आहे. तसेच या दिवाळीच्या वेळेस प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज बोनस म्हणून मिळणार आहे.
गटप्रवर्तक महिलांना त्यांच्या मूळ 6 हजार 200 रुपये वेतनामध्ये दुप्पट वाढ करून त्यांना आता 12 हजार चारशे रुपये मिळणार आहे. त्याशिवाय प्रवास भत्ता म्हणून 8475 रुपये आणखीन मिळणार असून त्यांना आरोग्यवर्धिनीचे दरमहा दीड हजार रुपये ज्यादा मिळणार आहेत. अशा प्रकारे त्यांना एकूण 21 हजार 450 रुपये मिळणार आहेत. त्याशिवाय आरोग्यवर्धनी कामाचे 1500 रूपये रक्कम मिळणार आहेत. त्यांनाही दोन हजार रुपये दिवाळीच्या वेळेस बोनस दिला जाणार आहे.

परंतु गटप्रवर्तकांच्या समायोजन संदर्भात यापुढेही लढा चालूच राहणार आहे. गटप्रवर्तकांच्या कंत्राटी कर्मचाऱयांच्या दर्जा देण्यासंदर्भात बोलताना आरोग्य मंत्री यांनी सांगितले की यासंदर्भातली आवश्यक कागदपत्रे सादर करावीत त्यानंतर परत याबद्दलची मीटिंग घेऊन निर्णय करण्यात येईल असे संघटनेच्या कृती समितीला सांगितले आहे. महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने कॉ एम. ए. पाटील, का.@ शंकर पुजारी, कॉ. राजू देसले, कॉ दिलीप उटाने, कॉम्रेड कॉ. अरमायटी, का.@ आनंदी अवघडे, भगवानदादा देशमुख व कॉ भगवान देवणे इत्यादी उपस्थित होते. तसेच शासनाच्या वतीने आरोग्य खात्याचे मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक धीरज कुमार व सहायक संचालक सुभाष बोरकर हे उपस्थित होते. गटप्रवर्तक व आशा महीलांच्या वतीने मनीषा खैरनार, प्रतिभा कर्डक, सुवर्णा लोहकरे ,दिपाली पाटील, सीमा रासकर उपस्थित होत्या.