देवरूख:- आर.बी.वेल्हाळ प्रायव्हेट, लिमिटेड या कंपनीकडून 28 सप्टेंबर रोजी रोड सेफ्टी आणि एच. आय. व्ही. एड्स जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. देवरूख ते तळेकांटे या रस्त्याचे काम करणार्या कारगारांसाठी प्रामुख्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम ली असोसिएट्स या कंपनीच्या सहाय्याने आयोजित करण्यात आला होता.
एच.आय.व्ही.एड्स या रोगाची कारणे आणि हा रोग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय तसेच रस्त्यावर काम करताना अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी व प्रथमोपचार प्रशिक्षण हे या कार्यक्रमाचे प्रमुख विषय होते.
ह्या कार्यक्रमाच्या अंत: उपस्थित कामगारांची आणि इतर सहभागी सदस्यांची मोफत एच.आय.व्ही. चाचणी करण्यात आली. यासाठी ग्रामीण जिल्हा रुग्णालय रत्नागिरीचे कॉसिंलर राहूल खरात आणि विलास मस्के हे उपस्थित होते.
या कार्याक्रमामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर रत्नागिरीच्या वतीने असिस्टंट इंजिनियर विना पुजारी डेप्युटी इंजिनियर , पुजा इंगोले सेक्शनल, इंजिनियर विकास देसाई तसेच भाजप तालुका अध्यक्ष श्री.प्रमोद अधटराव ली असोसिएट्सचे ज्ञानंद वर्मा, नागेंद्र कुमार, आर.बी.वेल्हाळ प्रायव्हेट लिमिटेड मार्फत श्री. ओंकार वेल्हाळ हे उपस्थित होते.