आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कारामध्ये संगमेश्वर तालुक्यात कुरधुंडा ग्रामपंचायतचा प्रथम क्रमांक

संगमेश्वर:- महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारामध्ये संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा ग्रामपंचायतने बाजी मारत प्रथम क्रमांक फटकवला असून या पुरस्काराचे १० लाखाचे मानकरी ठरले आहेत. हा पुरस्कार महाराष्ट्रचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी बी.एन.पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, अप्पर जिल्हाधिकारी शिंदे यांच्या हस्ते सावकर नाट्यगृह रत्नागिरी येथे देण्यात आला.

या मिळालेल्या सन्मानामुळे कुरधुंडा ग्रामपंचायतचे अभिनंदन केले जात आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत यामध्ये सहभागी झाल्या होत्या त्यामधून कुरधुंडा ग्रामपंचायतने आपला मानाचा तुरा उंचावला .अमृत महोत्सवाचे औचित्य साधून स्वातंत्र्यदिनी या पुरस्कार देण्यात आला.

    यावेळी मिळाला पुरस्कार हा कुरधुंडा गावातील प्रत्येक नागरिकांच्या  आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक यांच्या सहकार्यामुळे मिळाला असल्याचे सरपंच सबा अलजी यांनी सांगितले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सरपंच सबा अलजी, उपसरपंच तैमूर अलजी, ग्रामपंचायत सदस्य जमूरत अलजी, नाजीमा बांगी, शाहिस्ता अलजी, तंटामुक्ती अध्यक्ष उमर अलजी, महमद अलजी, उस्मान मालगुंडकर, जेष्ठ नागरिक अब्दुल्ला मालगुंडकर, अब्दुल्ला फकीर, समद मालगुंडकर, ग्रामसेवक श्रेया भाईजे, ग्रामसेवक रोशन जाधव, तरन्नूम अलजी, सलाम अलजी, हुसैन अलजी, एजाज अलजी, हुसैनमिया मालगुंडकर, मुनीर अलजी, सुरेश खापरे, आनंद खापरे, अविनाश लिंगायत, दीपक डावल, सुधीर पाताडे, दिनेश निंगवले आदी उपस्थित होते.